🏛️ आमच्या विषयी

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विकासासाठी वचनबद्ध

स्थापना: १९८४ ४० वर्षांचा अनुभव

🏛️ महामंडळाची स्थापना

समाजातील दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगणा-या विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातींच्‍या लोकांचा विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्र शासनाने दिनांक ८ फेब्रुवारी, १९८४ रोजी कंपनी कायदा, १९५६ नुसार महामंडळाची स्‍थापना केली आहे.

महत्त्वाचे: शासन निर्णय वनाम -१०९९/प्र.क्र.१२६/इमाव-२ दि- १३ जुलै, १९९९ नुसार विशेष मागास प्रवर्गातील जातींना कर्ज पुरवठा करण्‍याकरीता वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळास प्राधिकृत वाहिनी म्‍हणून शासनाने मान्‍यता दिली आहे.
४१
वर्षे

🎯 स्थापनेची उद्दिष्टे

विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्‍या समाजातील आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सवलतीच्‍या व्‍याज दराने अर्थसहाय्य देऊन त्‍यांच्‍या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्‍नतीकरिता महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

💰 महामंडळाचे अधिकृत व वितरीत भाग भांडवल

अधिकृत भांडवल

₹२००

कोटी

प्राप्त भांडवल

₹१९९.८७

कोटी

कर्जमाफी समावेश

₹४९.४९

कोटी

नोंद: वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु. २००.०० कोटी असून त्यापैकी मार्च, 2025 पर्यंत शासनाकडून रु.१९९.८७ कोटी भागभांडवली अंशदान म्हणून प्राप्त झाले आहे. सदर रक्कमेमध्ये शासन कर्जमाफीची रु.49.49 कोटी इतकी रक्कम समाविष्ट आहे.

🏢 उपकंपन्यांचा तपशील

अ.क्र. उपकंपनी शासन निर्णय/दिनांक स्थापना अधिकृत भागभांडवल प्राप्त भागभांडवल अप्राप्त भाग भांडवल
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
(रामोशी समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.१४/महामंडळे, दि.०९/०८/२०२३ दि.०४/०१/२०२४ रु. ५० कोटी रु. ४.४६ कोटी रु. ४५.५४ कोटी
पैलवान कै. मारुती चव्‍हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
(वडार समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.२२/महामंडळे, दि.०९/०८/२०२३ दि.२०/०१/२०२४ रु. ५० कोटी रु. ४.४६ कोटी रु. ४५.५४ कोटी
श्रीकृष्‍ण आर्थिक विकास महामंडळ
(गवळी समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.५२/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. ५० कोटी रु. ०.०० कोटी रु. ५०.०० कोटी
ब्रम्‍हलीन आचार्य दिव्‍यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ
(लोहार समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.७३/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. ५० कोटी रु. ०.०० कोटी रु. ५०.०० कोटी
विकणर समाज आर्थिक विकास महामंडळ
(विणकर समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.२४/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.३०/०५/२०२५ रु. ५० कोटी रु. ०.०० कोटी रु. ५०.०० कोटी
श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ
(नाथपंथीय समाजाकरीता)
शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.८०/महामंडळे, दि.०४/०३/२०२५ दि.०४/०८/२०२५ रु. ५० कोटी रु. ०.०० कोटी रु. ५०.०० कोटी
एकूण रु. ३००.०० कोटी रु. ८.९२ कोटी रु. २९१.०८ कोटी

👥 संचालक मंडळाबाबत

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळात एकूण ०९ सदस्य असून त्यामध्ये ६ शासकीय सदस्य३ अशासकीय सदस्य आहेत.

०९
एकूण सदस्य
०६
शासकीय
०३
अशासकीय
🏛️ शासकीय सदस्य
  • मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा मा. अध्यक्ष
  • मा. राज्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा मा. उपाध्यक्ष
  • मा. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
  • मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय
  • मा. सहसचिव/उपसचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
  • व्‍यवस्‍थापकीय संचालक
👤 अशासकीय सदस्य

३ सदस्य

समाजातील प्रतिनिधी सदस्य

🏢 महामंडळाची प्रशासकीय संरचना

प्रशासकीय नियंत्रण

महामंडळाचे प्रशासकीय नियंत्रण शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे आहे. महामंडळाच्या कार्यनियमावलीनुसार मा.अध्यक्ष व संचालक मंडळाची नियुक्ती शासनातर्फे केली जाते.

नोंदणीकृत मुख्यालय
जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर
गुलमोहर क्रॉस रोड क्र.९
विलेपार्ले (पश्चिम)
मुंबई ४०००४९

वेबसाईट
सर्व माहिती ऑनलाइन
जिल्हा कार्यालये
सर्व जिल्ह्यांमध्ये
उपकंपन्या
स्वतंत्र वेबसाईट

महामंडळाची स्‍थापना झालेपासून पासून सर्व जिल्ह्यांमध्ये महामंडळाची स्वतंत्र कार्यालये कार्यान्वित झालेली आहेत. महामंडळाची स्वत:ची वेबसाईट असून, सदर वेबसाईटवर महामंडळाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती तसेच महामंडळ राबवित असलेल्या सर्व योजनांची माहिती व कर्ज मागणी अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. सर्व उपकंपनींकरीता स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

👨‍💼 मुख्यालय, प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी वर्गाचा तपशील

अ.क्र. पदनाम मंजूर पदे कार्यरत अधिकारी / कर्मचारी रिक्त पदे
व्यवस्थापकीय संचालकप्रतिनियुक्‍तीने
महाव्यवस्थापक-
व्‍यवस्‍थापक (प्रशासन व कर्मचारी)
व्‍यवस्‍थापक (वित्‍त व लेखा)-
प्रादेशिक व्‍यवस्‍थापक
सहाय्यक व्‍यवस्‍थापक (प्र.व.क.)-
सहाय्यक व्‍यवस्‍थापक (वित्‍त व लेखा)-
सहाय्यक व्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प)-
जिल्‍हा व्‍यवस्‍थापक३२२५
१०व्‍यवस्‍थापकीय संचालकाचे स्‍वीय सहाय्यक (स्‍टेनो मराठी)-
११लघुटंकलेखक (इंग्रजी)-
१२कार्यालयीन सहाय्यक२४२१
१३लेखा सहाय्यक-
१४लिपीक टंकलेखक
१५वाहन चालक-
१६शिपाई१३
एकूण ९६ २२ ७४