कर्ज योजना
savings
25% बीज भांडवल कर्ज योजना
स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बीज भांडवल रूपाने २५% सहभाग, ४% व्याजदर आणि ५ वर्षांची परतफेड सुविधा.
बँक सहभाग ७५% असून प्रकल्प मर्यादा रु. ५ लाख पर्यंत.
account_balance
रु. 1.00 लाख थेट कर्ज योजना
लघु उद्यमांसाठी रु. १ लाख थेट कर्ज, नियमित परतफेडीवर व्याजमुक्त सुविधा आणि ४८ मासिक हप्ते.
वेळेवर हप्ता भरणाऱ्या लाभार्थींना पूर्ण व्याज परतावा.
credit_score
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
रु. १५ लाखांपर्यंतच्या कर्जावर १२% मर्यादेत व्याज परतावा, PFMS प्रणालीद्वारे थेट खात्यात जमा.
महामंडळ मान्य LOI नंतरच बँक कर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
groups
गट कर्ज व्याज परतावा योजना
नोंदणीकृत स्वयंसहायता गट, सहकारी संस्था किंवा भागीदारींसाठी व्याज परतावा व उद्यम मार्गदर्शन.
गटातील किमान ५ सदस्य व अधिकृत प्रतिनिधी आवश्यक.
अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन
ऑनलाइन तसेच जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज सादर करताना आवश्यक चरण समजून घेण्यासाठी खालील दुवे पाहा:
महत्वाच्या सूचना
- अर्जदाराचा जात दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि आधार क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक.
- कर्ज प्रकरणासाठी निवडलेला प्रकल्प व्यवहार्य असल्याची खात्री करून प्रकल्प अहवाल तयार ठेवा.
- महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) मिळाल्यानंतरच बँक प्रक्रियेला पुढील टप्प्यावर न्या.
- नियमित परतफेड न झाल्यास व्याज परतावा किंवा अनुदान रद्द होऊ शकते.
support_agent
सहाय्य हवे आहे?
हेल्पलाइन: 022-2620 2588 | ईमेल: info@vasantraonaikvimuktajati.org